Wednesday, March 29, 2023

ठाकरे सरकार हे महाराष्ट्रातच्या इतिहासातील पळपुटे, खंडणीखोर”; फडणवीसांचा हल्लाबोल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विविध भरती परीक्षांतील गैरव्यवहारावरून भाजपकडून राज्य सरकावर टीका केली जात आहे. दरम्यान आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार हे महाराष्ट्रातच्या इतिहासातील सगळ्यात पळपुटे, डरपोक, खंडणीखोर आणि भ्रष्टाचारी सरकार आहे. खादी टोळी एकत्र येऊन राज्य चालवत असल्याचे आज आपल्याला दिसत आहे, अशा अशब्दात फडणवीस यांनी टीका करीत हल्लाबोल केला.

मुंबईत आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप युवा मोर्चाची बैठक पार पडली. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये खंडणीखोरीची स्पर्धा लागली आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांना, नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपले सरकार राहणार की जाणार असे वाटत आहे. त्यामुळे हे मंत्री, नेते सरकार जाण्याअगोदर जेवढा भ्रष्टाचार करता येईल तितका करत आहेत.

- Advertisement -

या ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयामुळे राज्यात नोकरशाही भ्रष्ट होत असल्याची चिंता आहे. जनतेने आघाडी सरकारमधील तीन पक्षांवर विश्वास न दाखवता भाजपावर दाखवला. त्यामुळे भाजपचे 70 टक्के उमेदवार निवडून आले. त्यानंतर विश्वासघात करुन पुन्हा हे सरकार सत्तेवर आले. ज्या प्रकारचे परीक्षा घोटाळे बाहेर येत आहेत त्यातून युवा पिढी बरबाद करण्याचे काम सुरु असल्याची टीका यावेळी फडणवीस यांनी केली.