हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना ताप आल्यामुळे सोलापूर दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांनी आज स्वतः ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून मी गृहविलगीकरणात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे आणि उपचार करणे माझ्याकडून केले जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना कोविड चाचण्या करून घ्यावी. तसेच सर्वांची काळजी घ्या!, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.
I have tested #COVID19 positive and in home isolation.
Taking medication & treatment as per the doctor’s advice.
Those who have come in contact with me are advised to get Covid tests done.
Take care everyone !— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 5, 2022
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांच्याकडून दौरेही करण्यात आले होते. दरम्यान त्यांना सौम्य ताप आला असल्याने त्यांनी आपली कोरोनाची टेस्ट केली. यावेळी त्यांच्या शरीरात कोरोनाची लक्षणे आढळली.
देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांना ताप आल्यामुळे तो दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांचा हा दौरा अचानक का रद्द केला? याची चर्चा होती. आज त्यांनी ट्विट करत कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले.