“महाविकास आघाडी सरकारचे धिंडवडे निघालेत”; ओबीसी आरक्षण मुद्यावरून फडणवीसांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणावर सुनावणी घेतली. यावेळी न्यायालयाने राज्य सराकरच्या वतीने सादर केलेला मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला. या अहवालात राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी नसल्याचे म्हंटले. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची बेअब्रू झाली आहे. राज्य सरकारचे धिंडवडे निघाले आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिला. हा कुठला डेटा तुम्ही कट पेस्ट करुन लावला. राज्य सरकारचे धिंडवडे निघाले आहेत. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे.

इतके दिवस देऊन अहवाल का तयार केला नाही हे कोर्टाने विचारले. सांगली जिल्ह्यातल्या 10 ग्रामपंचायतींनी आपला डेटा पाच ते सात दिवसात दिला. राज्य सरकारला हे सहज शक्य आहे. आपला नाकर्तेपणा लपवायचा कार्यक्रम सुरू आहे.न अशी टीकाही यावेळी फडणवीस यांनी केली आहे.

Leave a Comment