नाना भाऊ, शारीरिक उंचीबरोबर बौद्धिक उंचीही हवी !; देवेंद्र फडणवीसांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसही आक्रमक झाले. त्यांनी नाना पटोले हे बडबड करणारे व्यक्ती आहेत. त्यांची नुसती शारीरिक उंची आहे. त्याची बौद्धिक उंची नाही. त्यामुळे नाना भाऊ, शारीरिक उंचीबरोबर बौद्धिक उंचीही हवी, असे फडणवीसांनी म्हंटले.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून काँग्रेस आणि पटोलेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, काँग्रेस पक्ष कुठे चालला आहे? एकेकाळी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागासाठी ओळखले जाणारे, आता केवळ सत्तेसाठी इतके खाली झुकत आहेत? काँग्रेस हा लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्ष आहे की दहशत पसरवणारी संघटना? नाना भाऊ, शारीरिक उंचीबरोबर बौद्धिक उंचीही हवी !, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

यानंतर फडणवीस यांनी पटोले अंडी काँग्रेसवर निशाणा साधला असून त्यांनी टोलाही लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, पंजाबमध्ये पाकिस्तान सीमेजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सुरक्षेचा भंग, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी फोनवर बोलण्यासही नकार दिला ! आणि आता महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, “तो मोदींना मारू शकतो, मारू शकतो, मोदींना शिव्या देऊ शकतो…”, असे फडणवीस यांनी ट्विट करीत पटोलेंच्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

पटोले नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी व्हिडीओमध्ये केले आहे.

Leave a Comment