फडणवीस दबंग नेते, १०० अजित पवारांना खिशात घालून फिरतात- चंद्रकांतदादा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते असून 100 अजित पवारांना खिशात घेऊन फिरतात अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, गृह खाते राष्ट्रवादीच्या वाट्याला देऊ नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटलांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली तेव्हा तुम्ही हा सल्ला फडणवीसांना दिला होता का? असा प्रश्न पत्रकारांनी केला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका म्हंटल.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार असून येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

Leave a Comment