हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिनेशनास आज पहिल्याच दिवसापासून वादळी सुरुवात झाली. मुंबईत पार पडणाऱ्या या अधिवेशनात विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरले. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. “मलिक यांच्यावर दाऊदसोबत व्यवहार केल्याचा आरोप आहे. हसीना पैसे दिल्याचा आरोप आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते तर एका मिनिटात त्यांना काढून टाकले असते. कारण मुंबईसोबत गद्दारी करणाऱ्याला सोडले नसते,”असे फडणवीस यांनी म्हंटले.
मुंबईतील अधिवेशनावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले त्यातील आरोपीना पैसे दिल्याचा आरोप आहे. अशात मलिक यांना अटक करण्यात आली आहे. अशी अटक असताना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिकटला धरून नाही. आमची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे आहे. हसीना पारकरला 55 लाख रुपये पैसे देणे म्हणजे बॉंबस्फोटात सहभागी असणाऱ्या लोकांना मदत करण्यासारखे आहे. त्यामुळे आम्हची मागणी आहे कि अशा मंत्र्याला मंत्रिपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी भाजपाकडून पायऱ्यांवर आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला. नवाब मलियांचा राजीनामा झाला पाहिजे. असे म्हणत दाऊदच्या दलाल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नवाब मलिक देशाचे गद्दार असल्याच्या आशयाच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. एकंदरीत नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन अधिवेशनापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.