…तर मग घोडेबाजार होणार नाही; संजय राऊतांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेना नेते संजय राऊत यांनी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर घोडेबाजार करण्यात आल्याची टीका केली होती. त्या टीकेला फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. आमचे तिन्हीही लोक निवडणूक निवडून येणारच आहेत. आता त्यांनीच निर्णय घेणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी सरकारने आपला एक उमेदवार परत घेतला पाहिजे. तो घेतल्यास घोडेबाजार करण्याचा प्रश्नच होत नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.

राज्यसभेच्या जागेसाठी भाजपतर्फे आज पियुष गोयल, अनिल बोन्डे आणि धनंजय महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.या यावेळी ते म्हणाले की, आमच्या तिन्ही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत. आम्हाला या निवडणुकीत घोडेबाजार करायचा नाही. आमचे उमेदवार हे भाजपातील आहेत. ते महाराष्ट्रातील आहेत. पूर्णपणे राजकीय क्षेत्रात स्त्रियही आहेत. आम्हाला निश्चित विश्वास आहे कि ते तिन्हीही उमेदवार निवडून येतील, असे फडणवीस यांनी म्हंटले.

सद्सदविवेक बुद्धीने देखील काही लीक आम्हाला या ठिकाणी मतदान करणार आहेत. आणि त्याच्या मतांनी निश्चितच आमचे उमेदवार निवडून येतीलही असे फडणवीस यांनी म्हंटले आहे. संजय राऊत यांनी भाजपाकडून घोडेबाजार केला जाणार या आरोपांना आता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.