आहिल्यादेवींची जयंती हायजॅक करण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीसांचा NCP वर आरोप

0
55
Devendra Fadnavis NCP Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. या घटनेवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “हे अत्यंत चुकीचे आहे. आहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीला नेहमी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करून, या ठिकाणी हा कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जे अहिल्यादेवी याचे वंशज आहेत. त्यांनाही त्रास देण्याचा प्रयत्न झाला आहे. राम शिंदे जे स्वत: पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचे थेट वंशज आहेत. त्यांनाही त्रास दिला असून याकी पुन्हा गोपीचंद पडळकरांच्या बाबतीत तसा प्रकार घडला. पडळकर जे खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक आहिल्यादेवींच्या विचारांवर चालातात, त्यांना अडवण्यात येत आहे.

अशाप्रकारे कब्जा करण्याचे कारण काय आहे? पक्षाच्या पलीकडे जाऊन एखादा कार्यक्रम साजरा कराचा असतो. मात्र या ठिकाणी हायजॅक करण्याचा प्रयत्न होतोय, तो योग्य नाही. या संदर्भात गांभीर्याने विचार झाला पाहिजे आणि अशाप्रकारचे हायजॅकींग बंद झाले पाहिजे, असे फडणवीसांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here