मी मॅच्युर लिडर; उद्धव ठाकरेंना मला अपयशी ठरवायचे नाही – देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येचा आलेख उंचावतच असताना विरोधी पक्षीयांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या महाविकास आघाडी सरकार विरोधात आक्रमक झाले असून मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ते सडकून टीका करत आहेत. फडणवीस हे मुद्दामून सत्तेच्या हव्यासापोटी ठाकरे यांना अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. यावर आता मी एक मॅच्युर लीडर आहे. मला उद्धव ठाकरे यांना अपयशी ठरवायचे नाही अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे हे माझ्या मोठ्या बंधूंसारखे आहेत. मला कोणालाही अपयशी ठरवायचे नाही. उद्धवजी माझे मित्र आहेत. मी अनेक वर्ष त्यांच्यासोबत कामही केले आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदा निवडून आले. ते पहिल्यांदाच मुख्यमंत्रीही बनले. अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे यांच्याबद्दल चांगले शब्द काढले आहेङत. ठाकरे यांचा प्रत्यक्ष सत्तेतील अनुभव नवीन असल्याने काही गोष्टी समजून घ्यायला वेळ लागतो. तो वेळ आम्ही त्यांना दिला आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीनुसार काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. मात्र उद्धवजी असे करताना दिसत नाहीयेत. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीतही समन्वय नाहीये. ब्युरेक्रेट्समध्येही समन्वय नाहीये. आणि हा घडवण्याचे काम मुख्यमंत्री या नात्याने उद्धवजींचे आहे. आणि ते जर यात कमी पडत असतील तर ते दाखवून देणे हे माझे कर्तव्य आहे. असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मला कुठेही आत्ताच्या क्षणी उद्धवजींवर टीका करायची आहे. पॉईंट स्कोर करायचा आहे असं नाही. असे करून मला काही मिळणारही नाहीये. मी एक मॅच्युर लीडर आहे. मी अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे. कुठल्यावेळी काय बोलले पाहिजे आणि कुठल्या वेळी काय अपेक्षा केली पाहिजे हे मला चांगलं समजत. माझी दूरदृष्टी अजूनही चांगली आहे. मला जवळचा चष्मा लागला आहे. त्यामुळे मी जवळच्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे पाहू शकतो. असं फडणवीस यांनी सांगितले. कोरोना विरुद्ध लढण्याऐवजी या सरकारने पत्रकार आणि विरोधी पक्षांना शांत करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर ट्रॉलर्सच्या गॅंग उभ्या केल्या. मात्र असं केलं तरी सत्य हे जनते पर्यंत पोहोचतेच. आणि त्यामुळेच सध्या जनतेत प्रचंड असंतोष आहे. सरकारने बनवाबनवी करायची सोडून प्रत्यक्ष काम करावं. आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबाच नव्हे तर सरकार म्हणेल ते आम्ही करायला तयार आहोत. अशी फडणवीस म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”