पोलिसांना महाराष्ट्रातील दरोडेखोरांना पकडायला वेळ नाही, पण राणेंना नोटीस द्यायला वेळ आहे – देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कणकवली पोलिसांनी भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावल्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी याबाबत राग संताप व्यक्त केला आहे. राणेंच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभे आहे, राज्यात पोलिसांना दरोडेखोर, बलात्काऱ्यांना पकडायला वेळ मिळत नाही. पण राणेंच्या पाठिमागे लागायला वेळ आहे. घरावरती जाऊन नोटिसा चिकटवतात हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, अशी प्रतिक्रया फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी जी नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या या प्रकारचा मी निषेध करतो. सिंधुदुर्गमध्येही अनेक बेकायदेशीर धंदे सध्या आहेत, त्याकडे लक्ष द्यायला पोलिसांना वेळ नाही मात्र, राणेंच्या पाठिमागे लागायला वेळ आहे.

राणे पिता पुत्रांवरील पोलिसांच्या कारवाईवरून भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनीही ट्विट करीत ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. कोणत्याही प्रकारची चूक केली नसताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्राचे पोलिस नोटीस बजावून आमच्या समोर येऊन उभे रहा असे आदेश देतात. वारे वा..ठाकरे सरकार ! फुले, शाहू, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे !, अशी टीका शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

Leave a Comment