हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी राज्यांना मोठा दिलासा दिला. दरम्यान या अर्थसंकल्पाबाबत राज्यातील राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा असल्याचे मत विकत केले आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी आज संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे. याबद्दल या दोघांचेही आम्ही आभार मानतो.
अर्थमंत्री सीतारामनजी यांनी जो आज अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात देशातील सर्व घटकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. कार्य अर्थाने आत्मनिर्भर भारत तयार करणारा हा अर्थसंकल्प म्हणावा लागेल, असे फडणवीस यांनी म्हंटले.
LIVE| Aatmanirbhar aur Shaktishali Bharat ka Budget2022 !#AatmanirbharBharatKaBudget#Budget2022 https://t.co/rKJUy1pyro
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2022
शेती क्षेत्रात २सहकार आणि खासगी संस्थामधील करामध्ये मोठी तफावत होती. सहकारी संस्थांवर 18.5 टक्के टॅक्स तर दुसरीकडे खासगी संस्थांना मात्र, 15 टक्केच टॅक्स होता. त्यामुळे विकास कामात अडथळा आणि सहकारी संस्थांना पाहिजे तसे पाठबळ मिळत नव्हते मात्र, अर्थसंकल्पातील निर्णयामुळे आता ही तफावत दूर होणार असल्याचे फडणवीस यांनी म्हंटले.