हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार व विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. “महाराष्ट्राच्या प्रशासनाला जे इन्फेक्शन झालं होत. ते दूर करण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही केलं आहे. त्यामुळं आता पुन्हा शासन-प्रशासन सुदृढ झालं आहे. शरद पवारांना एवढंच सांगेन कि नरेटिव्ह सांगायच्या आधी अनिल देशमुखांच्या सुटकेचा जो आदेश आहे. तो एकदा वाचून पहावा. त्यानंतर काय आरोप करायचे आहे करा. मग तुमच्या लक्षात येईल कि कोर्टाने नेमकं काय म्हंटल आहे, असे फडणवीस यांनी म्हंटले.
देवेंद्र फडणवीस यांनी आज बीड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं. राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदुधर्म तिन्हींचे रक्षण त्यांनी केलं. का बरं त्यांना मारलं? काय म्हणत होता त्यांना औरंगजेब. एवढंच म्हणत होता की, तुम्ही धर्मांतर करा,पण त्यांनी मान्य केलं नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्म याकरिता हाल अपेष्ठा होऊन त्यांचं बलिदान झालेलं आहे.
LIVE | Media interaction in #Beed https://t.co/EDCIVhu3JO
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 31, 2022
त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे केले. पण तरी देखील त्यांनी स्वधर्म, स्वराष्ट्राची भाषा त्यांनी सोडली नाही. आणि म्हणून अजित पवारांनी किंवा त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला हे दाखवण्याचा यती देखील छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होतेच पण ते धर्मवीर देखील होते, असा टोला फडणवीसांनी अजित पवारांना लगावला आहे.