मुंबई प्रतिनिधी | पक्षांतरांच्या धबडग्यात धनंजय मुंडे अद्याप बोलले कसे नाहीत याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच धनंजय मुंडे यांनी पक्षांतराच्या हालचालीवर आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सरकारे येतात आणि जातात परंतु बाजी पलटणे में देर नही लगती असे भविष्य कालीन भाकीत सांगणारे ट्विट धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर खात्यावर टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रवादी पक्षातून अनेक मातब्बर नेते भाजपमध्ये दाखल होऊ लागले आहेत. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवरच टीकास्त्र सोडले आहे. त्यांच्या टीकेमुळे भाजपच्या देखील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. मात्र पवारांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. मुख्यमंत्री ईडी आणि एसीबीचा धाक दाखवून विरोधीपक्षातील आमदारांना आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न करत आहे असे शरद पवार यांनी म्हणले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आत्मपरीक्षनाचा सल्ला दिला आहे.
सत्तेचा दुरुपयोग करून विरोधी पक्षातील आमदार आपल्या पक्षात आणण्याची अनिष्ट प्रथा भाजप सुरु करते आहे असा आरोप करत धनंजय मुंडे यांनी सरकारे येतील आणि जातील मात्र बाजी पलटणे में देर नही लगती असे भाकीत केले आहे. त्यांच्या या विधानाचा सत्ताधारी भाजपकडून खरपूस समाचार घेतला जाणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे.
हे पण वाचा –
देवेंद्र फडणवीस ‘या’ मतदार संघातून लढणार आगामी विधानसभा
बाजी पलटणे में देर नही लगती : धनंजय मुंडे
शिवेंद्रराजे, संग्राम जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत : शरद पवार
आता सगळा हिशोब करणार चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना ओपन चालेंज
शरद पवारांनी केल्याल्या आरोपावर मुख्यमंत्री म्हणतात
पक्ष सोडण्याआधी चित्र वाघ मला भेटल्या होत्या : शरद पवार
‘मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत ‘ – उद्धव ठाकरे