मुंबई प्रतिनिधी |राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा २०वा वर्धापन दिन कालमुंबई या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमानिमित्त झालेल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी इव्हिएम मशीनवर शंका उपस्थित केली. तर अजित पवार यांनी इव्हिएम मशीनवर शंका घेणे गैर आहे असे म्हणून मुंडेंचे विधान खोडून काढले. राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्यांच्या भाषणावरून दोन्ही नेत्यात असलेली विसंगती भर सभेत उघडी पडली.
सर्व विरोधी पक्षांचे नेते आणि विरोधी पक्षाला मत दिलेले मतदार भाजपच्या विजयाला विजय मानलाय तयार नाहीत. कारण भाजपने मिळवलेला हा विजय इव्हिएम मशीनमध्ये घोटाळा करून मिळवलेला विजय आहे असे लोकांचे मत आहे असे धनंजय मुंडे म्हणाले. तर त्यांच्या नंतर भाषणाला उभा राहिलेल्या अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा हा मुद्दा खोडून काढला. ज्या ठिकाणी आपण निवडून येतो त्या ठिकाणी इव्हिएम मशीनमध्ये घोटाळा नसतो आणि आपण ज्या ठिकाणी पराभूत होतो त्या ठिकाणी मात्र इव्हिएम मशीनमध्ये घोटाळा असतो असे म्हणणे उचित ठरणार नाही असे म्हणून अविधान खोदून काढले. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचे विधान खोडून काढले.
इव्हिएम मशीनच्या फेरफारीच्या मुद्द्यावरून खुद्द शरद पवार आणि अजित पवारयांच्यात मत भिन्नता आहे. अजित पवार यांनी नेहमी एकच भूमिका मांडली आहे ती म्हणजे इव्हिएम मशीनमध्ये फेरफार केला जाऊ शकत नाही. तर शरद पवार यांनी या मुद्द्यावर नेहमीच बदलती भूमिका मांडली आहे.