Diabetes: रोजच्या जीवनातील ‘या’ छोट्या सवयींमुळे वाढू शकते तुमच्या रक्तातील साखर

Diabetes
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकालच्या या धावपळीच्या दुनियेत अनेक लोकांना मधुमेहाचा त्रास असल्याचे आपण पाहत आहोत . खास करून गेल्या 10 वर्षात भारतात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाढते वय, चुकीची जीवनशैली किंवा अनुवंशिकमुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. रोजच्या जीवनातील अनेक छोट्या छोट्या सवयी सुद्धा रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत असतात. चला आज आपण जाणून घेऊया याबाबत सविस्तर ….

नाष्टा करण्याची सवय बंद करणे धोकादायक –

आपण कितीही धावपळीत असलो तरी आपल्या खाण्यापिण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जर तुम्हाला मधुमेह असेल, तर तुमच्या खाण्यापिण्याबरोबरच त्याच्या वेळेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेही रुग्णांना रुग्णांना जास्त वेळ रिकाम्या पोटी न राहण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच मधुमेहाने त्रस्त लोकांसाठी नाश्ता खूप महत्त्वाचा आहे.

जास्त वेळ एका जागी बसू नये –

मधुमेहाच्या रुग्णांसाठी शरीराची हालचाल आणि व्यायाम खूप महत्त्वाचा असतो. अनेक वेळा ऑफिस मध्ये सलग ८ तास बसून काम केलं जाते मात्र ही सवय आरोग्याला घातक आहे. तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, आळशी जीवनशैलीत राहणे आणि शारीरिक हालचाली न केल्याने अनेक लोकांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढला आहे.

एकटेपणा देखील धोकादायक –

काहीजण लोकांमध्ये जास्त मिसळत नाहीत, आणि एकटच राहणे पसंत करतात. परंतु अमेरिकेतील एका सर्वेक्षणानुसार, असे आढळून आले आहे की, दीर्घकाळ एकटेपणामुळे टाइप २ मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो. जे लोक एकटे राहतात. आणि लोकांसोबत जास्त मिसळत नाहीत त्यांना टाइप २ मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.