दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बार्शी प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे बार्शी मतदारसंघाचे आमदार दिलीप सोपल यांनी काल राष्ट्रवादीच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली. देवदर्शनाला बाहेरगावी गेलो असल्याचे कारण सांगत दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला जाणे टाळले. अशा अवस्थेत दिलीप सोपल भाजपच्या संपर्कात असल्याचे देखील वृत्त सूत्रांनी दिले आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत यांच्या चिंता वाढल्या आहेत.

काही करून निवडणूक जिंकायचीच असा कयास असणारे बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. तर त्यांच्या आधीच भाजपमध्ये येऊन भाजपच्या उमेदवारीवर दावा सांगणारे दिलीप सोपल यांचे कडवे विरोधक राजेंद्र राऊत हे आता चिंतातुर झाले आहेत. दिलीप सोपल यांनी भाजपमध्ये येऊन विद्यमान आमदार असण्याच्या निकषावर उमेदवारी मागितल्यास राजेंद्र राऊत यांना माघार घ्यावी लागेल. त्यानंतर मात्र दोघांना एकत्रित पक्षाचे काम करावे लागणार. तसेच राजेंद्र राऊत उमेदवारी नमिळाल्यास अपक्ष देखील उभा राहू शकतात असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान अजित पवार यांना दिलीप सोपल यांनी आपला पक्ष सोडण्याचा कसलाच विचार नाही असे म्हणले आहे. त्यामुळे दिलीप सोपल भाजपमध्ये येणार का असा सवाल देखील पुन्हा पुन्हा डोके वर काढू लागला आहे. दिलीप सोपल जर भाजपमध्ये आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली तरी देखील त्यांचा पराभव यावेळी कोणी रोखू शकणार नाही असे सध्या राऊत गटात बोलले जाते आहे. त्यामुळे सर्वेवर तिकीट वाटप करणारा भाजप पक्ष बार्शीचा विशेष सर्वे करून राऊत कि सोपल याचा निवडा करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ; भाजपमध्ये करणार प्रवेश

वराती मागून घोडे ; कुमार स्वामी देणार भाजपला पाठिंबा

बागलांचा जीव भांड्यात ; संजय शिंदे करमाळा विधानसभेसाठी इच्छुक नाहीत

Leave a Comment