औरंगाबाद प्रतिनिधी| वंचित बहुजन आघाडीची साथ कधीही जोडणार नाही असे म्हणणाऱ्या असुद्दीन ओवेसी यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांना युती तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाप्रमाणे जलील यांनी वंचित सोबत असणार युती आपण तोडत असल्याचे जाहीर केले आहे.
एमआयएमने वंचित आघाडीला सोडणे हे देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी धोकादायक आहे. कारण पुन्हा मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होऊन भाजपला याचा अधिक प्रमाणात फायदा होणार असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्याच प्रमाणे वंचितला व्यक्तिगत मोठा फरक पडणार नाही असे देखील बोलले जाते आहे.
प्रकाश आंबेडकर एमआयएमसाठी फक्त आठ जागा सोडण्याच्या तयारीत होते. एमआयएम च्या नेत्यांसोबत जागावाटपाची बोलणी जुळत नव्हती म्हणून प्रकाश आंबेडकर हे हैद्राबाद येथे जाऊन ओवेसींची भेट घेऊन आले होते. मात्र त्यानंतर देखील जागावाटपावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे एमआयएमने वंचित सोबत असणारी युती तोडली आहे. वंचित पासून एमआयएम बाजूला झाल्याने काँग्रेस वंचित सोबत आघाडी करण्यास अधिक आग्रही होण्याची शक्यता नजीकच्या काळात आहे. त्याच प्रमाणे वंचित स्वबळावर लढण्याचा आपला खाक्या सोडणार नाही असे देखील चित्र आहे.