हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या सध्याच्या काळात फसवणूकीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. म्हणूनच RBI सामान्य लोकांना हे टाळण्यासाठी सतत माहिती देत असते. असे असूनही, जर आपल्या खात्यातून पैसे चोरी झाले तर यासाठी आपल्याला काय करावे लागेल. RBI ने आपल्या ट्विटर हँडलवरही याबाबतची माहिती दिली आहे. चला ते मग त्याबद्दल जाणून घेऊयात …
बँक खातेदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 6 जुलै 2017 रोजी या संदर्भात एक सर्क्युलर जारी केले होते. या सर्क्युलरमध्ये असे नमूद केले गेले आहे की, एकदा खात्यातून अनधिकृत व्यवहार किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकाने काय करावे जेणेकरून त्याचे नुकसान होऊ नये.
3 दिवसात फसवणूकीची माहिती द्या – रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलरनुसार, जर तुमच्या बँक खात्यातून अनधिकृत व्यवहार किंवा फसवणूक झाली असेल तर, तीन दिवसांत कोणत्याही प्रकारे बँकेला कळवा. याबाबत बँकेला माहिती देणे बंधनकारक आहे. आपण हे केल्यास आपली या प्रकरणात झिरो लायबिलिटी असेल. जर आपल्या चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे अनधिकृत व्यवहार किंवा फसवणूक झाली नसेल तर बँक झालेल्या नुकसानाची संपूर्ण भरपाई करेल.
आपण 3 दिवसानंतर माहिती दिली तर काय होईल? – जर तुमच्या खात्यात अनधिकृत व्यवहार किंवा फसवणूक झाली असेल आणि तुम्ही याची माहिती बँकेला 4 ते 7 दिवसांच्या दरम्यान दिली असेल तर या प्रकरणात तुमची लिमिटेड लायबिलिटी असेल. म्हणजेच, अनधिकृत व्यवहाराच्या मूल्यांचा काही भाग आपल्याला सहन करावा लागतो.
आपण किती पैसे परत मिळवाल? जर आपले बँक अकाउंट हे बेसिक सेव्हिंग बँकिंग डिपॉझिट अकाउंट म्हणजेच झिरो बॅलन्स अकाउंट असेल तर आपली लायबिलिटी 5000 रुपये असेल. म्हणजेच जर तुमच्या बँक खात्यातून 10,000 रुपयांचा अनधिकृत व्यवहार झाला तर तुम्हाला बँकेतून फक्त 5000 रुपये परत मिळतील. उर्वरित 5000 रुपयांचे नुकसान तुम्हाला सहन करावे लागेल.
बचत खात्याचे नियम काय आहेत? – जर तुमचे बचत खाते असेल आणि तुमच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार झाले तर तुमची लायबिलिटी 10,000 रुपये असेल. म्हणजेच जर तुमच्या खात्यातून 20,000 रुपयांचा अनधिकृत व्यवहार झाला तर तुम्हाला बँकेतून फक्त 10,000 रुपये परत मिळतील. उर्वरित 10,000 रुपयांचे नुकसान तुम्हाला सहन करावे लागेल.
करंट अकाउंट आणि क्रेडिट कार्डसंदर्भातील नियम काय आहे? – जर आपल्या करंट अकाउंटमध्ये किंवा 5 लाख रुपयांपेक्षा अधिक लिमिटच्या क्रेडिट कार्डमध्ये अनधिकृत व्यवहार झाले तर अशा परिस्थितीत आपली लायबिलिटी ही 25,000 रुपये असेल. म्हणजेच, जर तुमच्या खात्यातून 50,000 रुपयांचा अनधिकृत व्यवहार झाला असेल तर बँक तुम्हाला फक्त 25,000 रुपये देईल. उर्वरित 25,000 रुपयांचे नुकसान तुम्हाला सहन करावे लागेल.
7 दिवसानंतर बँकेला माहिती दिली तर काय होईल? जर आपण माहिती मिळाल्यापासूनच्या 7 दिवसानंतर आपल्या खात्यातून झालेल्या अनधिकृत व्यवहाराची माहिती बँकेला दिली असेल तर या प्रकरणात ते आपली लायबिलिटी कसे ठरवणार हे बँकेच्या मंडळावर आहे. आपल्याला पाहिजे असल्यास अशा परिस्थितीत बँक आपली लायबिलिटी देखील माफ करू शकते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.