हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर्सची खरेदी-विक्री करण्यासाठी डिमॅट अकाउंट (Demat Account) असणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे डिमॅट खाते असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. वास्तविक, 14 जून रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कडून एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. ज्यामध्ये असे सांगण्यात आले कि, यापुढे डिमॅट खातेधारकांना 30 सप्टेंबर 2022 पर्यंत टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन एनेबल करावे लागेल. जर कोणी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन केले नाही तर 1 ऑक्टोबर 2022 पासून त्याला डीमॅट खात्यात लॉग इन करता येणार नाही.
या परिपत्रकात NSE कडून सांगण्यात आले की, यापुढे कोणत्याही खातेधारकाला आपल्या डीमॅट खात्यामध्ये (Demat Account) लॉग इन करण्यासाठी ऑथेंटिकेशन फॅक्टर म्हणून बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरावे लागेल. यासोबतचा दुसरा मार्ग म्हणजे क्नॉलेज फॅक्टर. जो कि, पासवर्ड, पिन किंवा कोणताही पोझिशन फॅक्टर असू शकेल ज्याची माहीती फक्त युझर्सलाच असेल.
ईमेल आणि एसएमएसवर मिळणार OTP
आता ग्राहकांना ईमेल आणि एसएमएसद्वारे स्मार्टफोन किंवा डेस्कटॉपवर OTP मिळेल. तसेच बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन शक्य नसलेल्या प्रकरणांमध्ये ग्राहकांना क्नॉलेज फॅक्टर वापरावा लागेल. जो कि, पासवर्ड/पिन, पोझिशन फॅक्टर (ओटीपी/सिक्योरिटी टोकन) आणि युझर आयडी असू शकेल.
याबाबत तज्ञ सांगतात की, बहुतेक स्टॉक ब्रोकर्सकडून दुसरा ऑथेंटिकेशन फॅक्टर वापरला जात आहे. मात्र यामध्ये पासवर्डचा समावेश नाही. हे लक्षात घ्या कि, पासवर्ड आणि पिन हे दोन्ही क्नॉलेज फॅक्टर आहेत. तसेच ऑथेंटिकेशनसाठी हे दोन वेगळे फॅक्टर मानले जाऊ शकणार नाहीत. Demat Account
30 सप्टेंबरपासून टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन करणे बंधनकारक
NSE आणि BSE कडून या संदर्भात SEBI च्या 3 डिसेंबर 2018 च्या परिपत्रकाचा संदर्भ देण्यात आला आहे. सायबर सिक्योरिटीशी संबंधित या परिपत्रकात ऑथेंटिकेशन फॅक्टरबाबत एक प्रकारचा फरक सांगण्यात आला आहे. आता NSE ने 30 सप्टेंबरपासून लॉगिनसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन बंधनकारक केले आहे. Demat Account
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन अशा प्रकारे एनेबल करा
आपल्या डीमॅट खात्यामध्ये (Demat Account) टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन एनेबल्ड करण्यासाठी पासवर्ड, पिन किंवा ओटीपी सिक्योरिटी टोकनसह बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरावे लागेल. यानंतर OTP सिक्युरिटी टोकनसह पासवर्ड पिन वापरून डीमॅट खात्यांमध्ये लॉगिन करण्याची परवानगी दिली जाईल. यानंतर Upstox युझर्सना OTP आणि PIN टाकावा लागेल. दुसरीकडे, मोबाइलमध्ये लॉगिन केल्यास, OTP किंवा PIN सह बायोमेट्रिक्स वापरावे लागतील. यासोबत, OTP मिळवण्यासाठी, आपल्या मोबाईल आणि PC मध्ये Google Authenticator App किंवा Microsoft Authenticator App इंस्टॉल करावे लागेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://upstox.com/open-demat-account/
हे पण वाचा :
FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकेने FD वरील व्याजदरात केली पुन्हा वाढ, नवीन दर तपासा
अमेरिकेतून नवीन iPhone 14 खरेदी करण्याचे फायदे अन् तोटे जाणून घ्या
Investment : ELSS की PPF यापैकी कोणती योजना जास्त फायदेशीर आहे ??? तज्ञांकडून जाणून घ्या
ICICI Bank ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!! 23 वर्षात दिला 220 पट रिटर्न
Post Office च्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा दुप्पट पैसे