बीड : हॅलो महाराष्ट्र – आतापर्यंत आपण गावच्या गुंडांमध्ये किंवा दोन गटांमध्ये हाणामारी (fighting) झाल्याचे पहिले किंवा ऐकले असेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये कोणी गावगुंड नाहीतर चक्क दोन सुशिक्षित डॉक्टर एकमेकांशी भिडताना (fighting) दिसत आहेत. डॉक्टर विठ्ठलदास हरकुट आणि डॉक्टर अतुल बिर्ला अशी या दोन्ही डॉक्टरची नावे आहेत. या हाणामारीची पोलिसानी दखल घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
काय घडले नेमके?
विठ्ठलदास हरकुट आणि अतुल बिर्ला हे दोघेही जण पेशाने डॉक्टर आहे. डॉक्टर हरकुट यांनी अतुल बिर्ला यांना एक प्रश्न विचारला होता. तुझ्या डोक्यावर लावलेला विग बरा आहे का? हरकुट यांनी विचारलेल्या या प्रश्नावर डॉक्टर बिर्ला प्रचंड संतापले. यानंतर या कारणावरून बिर्ला यांनी चाण जणांसह हरकुट यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण (fighting) केली. हि संपूर्ण मारहाणीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
'या' एका क्षुल्लक कारणावरून दोन डॉक्टरांमध्ये हाणामारी; CCTV फुटेज आले समोर pic.twitter.com/0WgcaoMHFg
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) December 9, 2022
काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, एक व्यक्ती फोनवर बोलताना दिसत आहे. एवढ्यात दुसरी व्यक्ती पाठीमागून येते आणि फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीला मारहाण (fighting) करण्याचा प्रयत्न करते. या दोघांचे झालेले भांडण पाहून आजूबाजूचे लोक भांडण सोडवायला मध्ये पडतात. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मादळमोही या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला आहे. गेवराई पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपी डॉक्टरांचा शोध घेत आहेत. त्यामुळे या डॉक्टरांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…