Dogecoin: एलन मस्कच्या ही क्रिप्टोकरन्सी ट्विटनंतर चर्चेमध्ये का आहे ? त्याबद्दलची माहिती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांत नवीन विक्रमी पातळी गाठल्यानंतर Dogecoin चर्चेत राहिला आहे. काही वर्षापूर्वी अगदी हसत खेळत सुरु करण्यात आलेला Dogecoin आता एक सुप्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बनला आहे. नुकताच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले एलन मस्क (Elon Musk) यांनी याबद्दल एक ट्विट केले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की,‘हू लेट द डॉज आउट.’ मागील आठवड्यातही मस्क यांनी ट्विटरवर Dogecoin चा उल्लेख केरण्याची ही दुसरी वेळ आहे. यानंतर, Dogecoin च्या चर्चेला जोर आला. हे ओपन-सोर्स डिजिटल चलन जे बिटकॉइनला पर्याय आहे.

सध्या, जगभरात 128 अब्जपेक्षा जास्त Dogecoin सर्कुलेशनमध्ये आहेत. असे मानले जाते की, ही फक्त एक सुरुवात आहे. मस्क यांच्या ट्विटनंतर गुंतवणूकदार आता Dogecoin मध्ये विशेष रस दर्शवित आहेत. अशा परिस्थितीत Dogecoin बद्दल अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे जाणून घेउयात, ज्याची आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

Dogecoin म्हणजे काय?
Dogecoin डिसेंबर 2013 मध्ये एक विनोद म्हणून याची सुरुवात झाली होती. बिटकॉइन, इथेरियम किंवा लिटकॉइनच्या तुलनेत डॉजकॉइन बद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. याची सुरुवात पीबी-टू-पीअर ट्रान्झॅक्शनसाठी (Peer-To-Peer Transaction) IBM सॉफ्टवेअर इंजिनिअर बिली मार्कस आणि अ‍ॅडोब इंजिनिअर जॅक्सन पामर यांनी केली. यांनी डॉजकोइनसाठी फॅन्सी चिन्ह निवडण्याऐवजी एक जपानी कुत्र्याचे ब्रीड शिबा इनू (Shiba Inu) निवडले. जे आधीपासूनच ऑनलाइन लोकप्रिय होते.

सुरुवातीला ते बिटकॉइन (Bitcoin) आणि इथेरियम (Etherium) सारखे यशस्वी नव्हते. तथापि, लाँच झाल्याच्या 72 तासांच्या आत, या क्रिप्टोकरन्सीमध्ये 300 टक्के वाढ झाली. लिटकॉइन (Litcoin) आणि लकीकॉइन (Luckycoin) च्या धर्तीवर, Dogecoin पासवर्ड आधारित स्क्रिप्ट टेक्नोलॉजी देखील वापरतो. हे वैशिष्ट्य त्यालाबिटकॉइनपेक्षा वेगळे करते, ज्यात SHA-256 एनक्रिप्शन वापरले जाते.

हे मनोरंजक आहे की डॉजकॉइनला चर्चेत आणणारे मस्क आधी बिटकॉइनचे समर्थक होते. 49 वर्षांच्या या उद्योजकाने गेल्याच आठवड्यात ट्वीट केले होते, ‘बिटकॉइन इज़ ए गुड थिंग’, म्हणजे बिटकॉइन चांगली गोष्ट आहे. त्यांनी आपले ट्विटर बायोही बदलले आणि # Bitcoin असे लिहिले. क्रिप्टोकरन्सीला पाठिंबा देण्यास त्यांनी उशीर केला असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर बिटकॉईनच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली.

Dogecoin ची किंमत किती आहे?
Dogecoin ची किंमत सध्या 0.071 यूएस डॉलर आहे. भारतीय रुपयांमध्ये ते 5.21 रुपये असेल. गेल्या 24 तासांत यामध्ये 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तथापि, बिटकॉइन आणि इथरियमच्या तुलनेत हे खूपच कमी आहे. सध्या एका बिटकॉईनची किंमत 48,192.10 यूएस डॉलर आहे. जर आपण भारतीय रुपयांमध्ये पाहिले तर ते 35,12,939.03 रुपये आहे. त्याचप्रमाणे, इथरियमची किंमत 1,770.06 यूएस डॉलर म्हणजेच 1,28,573.28 रुपये आहे.

Dogecoin कसे खरेदी करावे?
इतर कोणत्याही क्रिप्टोकरन्सी प्रमाणेच Dogecoin क्रिप्टोकरन्सी वॉलेट किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे देखील खरेदी केले जाऊ शकते. Dogecoin साठी एक डेडीकेटेड वॉलेट देखील आहे, जे स्मार्टफोन किंवा डेस्कटॉपद्वारे खरेदी केले जाऊ शकते. Dogecoin भारतात BuyUcoin, Bitbns, किंवा Zebpay यांच्यामार्फत खरेदी करता येईल. या प्लॅटफॉर्मवर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment