Tuesday, June 6, 2023

आम्हाला लाठीमार करावा लागेल अशी परिस्थिती उद्भवू नका- पोलीस महासंचालक

मुंबई । मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व शक्य उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच लोकांनी कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण केले पाहिजे, मुंबई पोलिस काटेकोरपणे वागत आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी सर्वसामान्यांना आवाहन करताना सांगितले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, त्यामुळे जनतेने आम्हाला सहकार्य करावे. आम्ही हमी देतो की आम्ही कोणालाही अनावश्यक त्रास देणार नाही, परंतु जाणूनबुजून कर्फ्यूचे उल्लंघन करू नका आणि आम्हाला लाठी वापरण्याची संधी देऊ नका.

बुधवारी सायंकाळी 8 वाजल्यापासून राज्यातील लॉकडाऊन अंमलात आला आहे. हे लक्षात घेता राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी माध्यमांद्वारे आवाहन केले आहे. ते म्हणाले, कलम 144 लागू केले जात आहे. म्हणून 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र घराबाहेर पडू नये. जर प्रत्यक्षात काही काम असेल आणि कोणी बाहेर असेल तर काही हरकत नाही. नियम जाणूनबुजून तोडू नका आणि कोणत्याही कारणाशिवाय बाहेर जाऊ नका. आपण हेतुपुरस्सर नियम मोडले तर आम्हाला लाठ्यांचा वापर करावा लागेल, अशी परिस्थिती येऊ देऊ नका.

संजय पांडे म्हणाले, ‘पोलिसांच्यात ताकद आहे पण, आम्ही कमीतकमी त्याचा वापर करू. परंतु लोकांनी सहकार्य न केल्यास कारवाई केली जाईल. आम्हाला कारवाई करायची इच्छा नाही कारण आज परिस्थिती भयानक आहे. आम्ही हमी देतो की, कोणत्याही कारणाशिवाय कोणतीही कारवाई केली जाणार नाही. परंतु आपल्याला नियमांचे पालन देखील करावे लागेल’. सर्व लोकांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले, जर काही तातडीचे काम असेल तर तुम्ही विना पास जाऊ शकता. परंतु आपण विनाकारण बाहेर पडल्यास कारवाई केली जाईल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group