राज्याला अजूनही 40 लाख लसींची आवश्यकता – राजेश टोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशासह राज्यात कोरोना आणि ओमिक्रोन रुग्ण संख्येत वाढ होत आहेत. अशा परिस्थितीत रुग्ण संख्या कमी करण्याबरोबर लोकांना लशीचा पुरवठा करण्याचा आव्हान राज्यापुढे आहे. यादरम्यान आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज महत्वाची माहिती दिली. राज्याला काल साडे सहा लाख लसी मिळाल्या असून त्या राज्यात वितरित केल्या जातील. परंतु, राज्याला 40 लाख लसींनी गरज आहे, मात्र सध्या राज्यात दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा स्टॉक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे.

आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. टोपे म्हणाले की, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनि राज्यातील मुख्यमंत्र्यासोबत संवाद साधला. यावेळी बैठकीत कोविड 19 प्रतिबंधात्मक कोव्हॅक्सिन लसीचे 40 तर कोविशिल्ड लसीचे 50 लाख डोस द्यावेत, अशी केंद्राकडे मागणी केली. मुलांचे लसीकरण आणि वयोवृद्धांना बुस्टर डोससाठी कोव्हॅक्सिन लस कमी पडत आहे, त्यामुळे वाढीव लसीच्या पुरवठ्याचीहि बैठकीत मागणी केली आहे.

दरम्यान, काल राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीस उपस्थित लावली. या कारणावरून भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर निशाणा साधला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपला प्रत्युत्तर दिले.

Leave a Comment