बोगस पदवी प्रकरणात डॉ. स्वप्ना पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करत वांद्रे पोलिसांकडून अटक

dr swapna patker
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – वांद्रे पोलिसांनी आज दुपारी बनावट डॉक्टर पदवी प्रकरणात सायकॉलिजिस्ट आणि चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांना अटक केली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात डॉ. स्वप्ना पाटकर यांच्याविरोधात तपास अधिकारी पीआय पद्माकर देवरे यांनी २६ मे रोजी भादंवि कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला.

हे प्रकरण कानपूर विद्यापीठाच्या बनावट पदवीबाबत आहे. तेथूनच डॉ. स्वप्ना पाटकर यांनी डॉक्टरेट पदवी मिळविल्याचा दावा तक्रारदार गुरदीप कौर यांनी केला आहे. डॉ. स्वप्ना पाटकर यांनी कानपूर विद्यापीठातील छत्रपती शाहूजी महाराज विश्व विद्यालय, कानपुर येथून २००९ साली नमूद विषयात पीएचडी केल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतले.

यानंतर तिने ते बनावट प्रमाणपत्र २०१६मध्ये लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ऑनररी कन्सल्टन्ट म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी वापरले. यानंतर स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या गुरदीप कौर यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात केली. अखेर आज डॉ. स्वप्ना पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. उद्या डॉ. स्वप्ना पाटकर यांना रिमांडसाठी कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली आहे.