माणगाव : हॅलो महाराष्ट्र – मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर नजीक कशेडी घाट रस्त्यावर चोळई गावाच्या हद्दीमध्ये एक भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातामध्ये (accident) रिक्षा चालकासह 3 विद्यार्थिनीं जागीच ठार झाल्या आहेत. या विद्यार्थींनी परीक्षा देऊन घरी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या तिन्ही विद्यार्थींनी एकाच गावच्या असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
काय घडले नेमके?
हाती आलेल्या माहितीनुसार, कशेडी घाट मार्गावर चोळई गावच्या वळणावर हा अपघात (accident) घडला.यामध्ये वाळूने भरलेला डंपर अचानक रिक्षावर उलटला. या अपघातात (accident) चौघांचा जागीच मृत्यू झाला. उमर बडुर असे या अपघातात मृत पावलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. हलिमा पोतेरे, असिया बडुर, नाजनिन करबेलकर अशी या अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत.
या विद्यार्थिनी माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील रहिवाशी आहेत. घटनेच्या वेळी या विद्यार्थिनी खेड येथून परीक्षा देऊन घरी परतत होत्या. यादरम्यान कशेडी घाट रस्त्यातील चोळई गावच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर रिक्षावर उलटून हा अपघात (accident) झाला. यामध्ये रिक्षाचालकासह 3 विद्यार्थिनींचा डंपरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले आणि चारही मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ प्लॅनमध्ये ग्राहकांना दिले जातात अतिरिक्त फायदे
राज्यात तलाठ्यांची 4000 पदे भरण्यात येणार
लग्नासाठी मुलगी पहायला जाताना आयशर-कारचा भीषण अपघात
सत्तारांना मुख्यमंत्र्यांनी खडसावले; सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश?
पत्नीच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाल्याने नैराश्यतेून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल