ही ‘ईडी’चं भाजपला संपविल्याशिवाय राहणार नाही! धनंजय मुंडेंचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । भाजपला (BJP) हिचं ‘ईडी’ (ED) संपविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर लोकसभा मतदारसंघामधील नागरिकांना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत श्रवणयंत्र वाटपाचा हा कार्यक्रम जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ईडी भाजपला संपविल्याशिवाय राहणार नाही, असं विधानही धनंजय मुंडेंनी यावेळी केलं. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्यानंतर धनंजय मुंडेंनी भाजपवर टीका केली.

शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकू न येणाऱ्या दिल्लीकरांना हे मोफत श्रवणयंत्र वाटावेत, अशी सूचना या कार्यक्रमात एकाने केली. तोच धागा धरून मुंडेंनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला. ज्या वेळेस यंत्र देऊनही एखाद्याचे श्रवण काम करत नसेल तेव्हा त्यास श्रवणाखाली देण्याची तरतूद ही असायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पोट याच शेतकऱ्यांनी गाळलेल्या घामामुळं भरतंय. आपल्याकडे म्हटलं जातं खाल्लेल्या अन्नाला तरी जाग, असं म्हणत मुंडेंनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. (ED Will Not Survive Without Ending The BJP Says Dhananjay Munde)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’