हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Edible Oil : होळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या दरवाढीपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सध्या खाद्यतेलाच्या मागणीमध्ये वाढ होऊनही त्यांच्या किमतींमध्ये घसरण झाल्याचे दिसून येते आहे. परदेशी बाजारातील किंमतींत झालेली घट तसेच देशांतर्गत तेलबियांच्या उत्पादनात झालेली वाढ हे यामागील कारण असल्याचे म्हंटले जात आहे.
हे जाणून घ्या कि, फेब्रुवारीमध्ये खाद्यतेलांच्या किंमतींत 10 टक्क्यांपर्यंतची घसरण झाली आहे. गेल्या एका वर्षात तर ते 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त झाले आहेत. गेल्या वर्षी या दिवशी मोहरीच्या तेलाची किंमत 165 ते 170 रुपये लिटर इतकी होती, जी आता 135 ते 140 रुपये लिटरवर आली आहे. त्याचप्रमाणे सूर्यफूल तेलाचा दर वर्षभरात 135-140 रुपयांवरून 115-120 रुपये प्रति लिटर तर रिफाइंड सोयाबीन तेलाचा भाव 140-145 रुपयांवरून 115-120 रुपयांपर्यंत खाली आला आहे. Edible Oil
केंद्र सरकारच्या आकड्यांवर नजर टाकल्यास गेल्या एका महिन्यात सोयाबीन तेल 3 टक्के तर मोहरीचे तेल 10 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. आयात करण्यात आलेल्या तेलांमध्ये, वर्षभरात आरबीडी पामोलिनच्या किंमती जवळपास 25 टक्क्यांनी घसरून 100 रुपये प्रति लिटर तर कच्च्या पाम तेलाच्या किंमती जवळपास 30 टक्क्यांनी घसरून 95 रुपये प्रति लिटरवर आल्या आहेत. सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर ऑइल इंडस्ट्री अँड ट्रेडशी संबंधित व्यापाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “होळीच्या दिवशी खाद्यतेलाची मागणी वाढली असली तरी त्यांच्या किंमती मात्र कमी झाल्या आहेत. कारण देशात तेलबियांचे बंपर उत्पादन अपेक्षित आहे आणि परदेशी बाजारपेठेतही खाद्यतेल स्वस्त झाले आहे.” Edible Oil
वास्तविकपणे भारतातील खाद्यतेलाच्या किंमती या परदेशी बाजारांवर अवलंबून असतात कारण देशात खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्स असोसिएशनशी संबंधित व्यावसायिकांचे म्हणणे आहे की,” ब्राझील आणि अर्जेंटिनामधील सोयाबीन आणि मलेशियामध्ये पाम तेलाचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे परदेशी बाजारात खाद्यतेलाच्या किंमती खाली आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देशात आयात केलेले तेल स्वस्त झाले आहे. याशिवाय खरीप हंगामात देशात सोयाबीनचे उत्पादनही जास्त झाले आहे. आता रब्बी हंगामात मोहरीचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे देशात तेलबियांचे उत्पादन वाढल्याने खाद्यतेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. Edible Oil
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.agriwatch.com/edible-oils/palm-oil/
हे पण वाचा :
Stock Market मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 7 शब्दांचा अर्थ जाणून घ्या
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!! होळीनंतर वाढणार इतका पगार
Multibagger Stock : कंप्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा
Reels बनवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! Facebook ने वाढवली व्हिडिओच्या वेळेची मर्यादा
धक्कादायक !!! American Airlines च्या विमानामध्ये मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशाने सहप्रवाशावर केली लघवी