मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक, विद्यापीठ परिक्षाबाबत होणार महत्वाचा निर्णय 

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक होणार आहे. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा होणार असून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे … Read more

पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक चाचणीबाबत होतेय ‘ही’ नवीन मागणी; वाचा काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीमध्ये शारीरिक चाचणीसाठी असलेले १.४ प्रमाण १.६ करावे अशी मागणी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीसाठी उपस्थितीचे प्रमाण हे सरासरी ५५% आहे तसेच, ४५% प्रमाण गैरहजरीचे असते. म्हणूनच जे विद्यार्थी ४-५ वर्षांपासून तयारी करत आहेत त्यांना संधी मिळणे … Read more

MPSC ने सिलॅबस बदलला नाही तर केवळ अपडेट केलाय? वाचा नक्की काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा (एमपीएससी) मुख्य परीक्षेच्या सहापैकी चार विषयांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. यात मराठी आणि इंग्रजी हे दोन भाषा विषय वगळण्यात आले आहेत. मात्र हा सिलॅबस पूर्णतः बदललेला नसून काही घटकांमध्ये बदल करून सिलॅबस अपडेट करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. सुधारित … Read more

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय ,सर्व विद्यापीठाच्या परीक्षा केल्या रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोरोना विषाणूच्या वाढत्या कहरांमुळे दिल्ली सरकारने महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आपल्या सर्व विद्यापीठांच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या संदर्भात ट्विट केले. दिल्लीत कोरोना व्हायरस पॉझिटिव्हची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दिल्लीत सध्या अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये क्वारंटाइन सेंटर उभारली आहेत. … Read more

पाचवीचे वर्ग २१ जुलैपासून तर दहावी, बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून होणार सुरु – बच्चू कडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना परिस्थिती अद्याप बदलली नसल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा कधी सुरु होतील याबाबत अद्याप काही तारीख निश्चित झालेली नाही पण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु करण्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले होते. मात्र जुलै महिन्यातही शाळा सुरु झाल्या नाही आहेत. आता … Read more

ATKT च्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारकडून दिलासा! सरासरी गुणांसह सर्वांना पास करणार

uday samant

मुंबई | राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत सरकारचा सावळा गोंधळ सुरु अाहे. केंद्रीय गृहखात्याने विद्यापीठ परिक्षांना परवानगी दिल्यानंतर युजीसीने अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत राज्य सरकारला अधिसुचना पाठवली होती. मात्र परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना सरासरी गुणांद्वारे पास करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ATKT च्या विद्यार्थ्यांना … Read more

CBSE निकालाची तारीख जाहीर नाही; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन

नवी दिल्ली । CBSE  बोर्डाच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याच्या बातम्या काही वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, अद्याप निकालाची तारीख जाहीर झाली नसल्याचं सीबीएसई बोर्डाने सांगितलं आहे. काही वेबसाईट वर 18 जुलै 12 वीच्या वर्गाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर 10 वी इयत्तेचा निकाल 15 ते 17 जुलैदरम्यान जाहीर … Read more

विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू होणार

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद आहेत. अशा वेळी मनुष्यबळ विकास मंत्रालय(HRD Ministry) व UGCच्या बैठकीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय या बैठकीत झाल्याचं समजतंय. ‘साम टीव्ही’च्या वृत्तानुसार, JEE-NEET परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही … Read more

‘महाजॉब्स’ पोर्टलला भरघोस प्रतिसाद; नोंदणी केलेल्या रोजगार इच्छूकांची संख्या लाखांच्यावर

मुंबई । कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रातील भूमीपुत्रांना रोजगार मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महाजॉब्स पोर्टलला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी या पोर्टलवर ८८,४७३ रोजगार इच्छूक उमेदवारांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. तर ज्या कंपन्यांना कामगार हवे आहेत अशा ७५१ कंपन्यांनी नोंदणी केली आहे. सोमवारी ६ जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाजॉब्स पोर्टलचं उद्घाटन झालं होतं. तर … Read more

राजकारण करायला निवडणुका आहेत ना, विद्यार्थ्यांच्या जीवाशी कशाला खेळ करता- उदय सामंत

मुंबई । विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात येणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर आता राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारला पत्र धाडले आहे. दरम्यान या मुद्द्यावर उदय सामंत यांनी मंगळवारी ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले की, अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ नयेत, या भूमिकेवर राज्य सरकार ठाम आहे. … Read more