सूनबाईंच्या प्रचारासाठी खडसेचे रुग्णालयातून फोनद्वारे भाषण

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । प्रतिनिधी

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. कोथळी येथील संत मुक्ताबाई मंदिरात दर्शन घेऊन रक्षा खडसे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभाला एकनाथ खडसे मात्र प्रकृतीच्या कारणावरून उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी फोनवरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांना लोकसभा निवडणुकीला विजयी करण्याचे आवाहन केले तेव्हा रक्षा खडसे भावुक झाल्या. त्यांनी प्रचार सभा संपन्न झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. त्यात रक्षा खडसे म्हणाल्या कि, आज रावेर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार सुरु केला आहे. लोकांना देश उचित हातात जावा असे वाटते म्हणून लोक भाजपला पुन्हा निवडून देणार आहेत. त्याच प्रमाणे एकनाथ खडसे आज प्रचाराला येऊ शकले नाहीत याचे दुःख आहे. मात्र ते पुढील काही दिवसात आपणाला प्रचारसभांमध्ये दिसतील.

जळगावच्या जागेचा भाजपने उमेदवार का बदलला हा प्रश्न विचारला विचारताच रक्षा खडसे म्हणाल्या कि , हा पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे मी या बद्दल काहीच बोलू शकत नाही. मात्र पक्षाने जो निर्णय घेतला असेल तो उचितच असेल असे रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

अहमदनगरमध्ये काँग्रेसचा भाजपला जाहीर पाठिंबा

नगर दक्षिण मतदारसंघासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी आणि दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या..

अजित पवारांनी सुजय विखे-पाटील यांना दिली होती ‘ही’ ऑफर

नगरचे नगरसेवक म्हणतात “कोणता झेंडा घेऊ हाती?”

राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा

या कारणामुळे मी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, नरेंन्द्र पाटील यांचा गौप्यस्फोट

मोहिते-पाटलांचा पत्ता कट… भाजपकडून माढा मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर