हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची याप्रकरणी ईडीकडून गेली नऊ तास चौकशी करण्यात आली. खडसेंच्या ईडी चौकशीवरून भाजप – राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. स्वतः खडसेंनी माझ्यावर राजकीय हेतूने चौकशी केली जात असून या ईडीच्या चौकशीत राजकीय वास येत असल्याचे सांगत भाजपचे अप्रत्यक्ष नाव घेतले होते. त्यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली असून “खडसेंवर कारवाई हि सूडबुद्धी व राजकीय हेतूतून कण्यात आले आहे,” असे म्हंटले आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीकेलाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत एकनाथ खडसे यांच्यावर जी काही ईडीने कारवाई केली आहे. तो एक प्रकारचा कायदेशीर भाग आहे. ईडी आपलं काम कायदेशीर पद्धतीने करीत आहे. कायदा आपलं काम करतोय. भाजपमध्ये अशा प्रकारचे सुडाचे राजकारण केले जात नाही, असे म्हंटले होते. त्यांना मलिक यांनी उत्तर दिले असून भाजपलाच खडसेंच्या कारवाईसाठी जबाबदार धरले आहे.
मलिक यांनी म्हंटले आहे कि, खडसे हे ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. त्यांनी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांनी घाबरण्याचे काही कारणच नाही. मात्र, भाजपकडून ईडी सारख्या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव टाकला जात आहे. यामुळे राजकीय गणिते बदलतील असे भाजपला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे.