Saturday, January 28, 2023

राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा; म्हणाले…

- Advertisement -

जळगाव प्रतिनिधी । भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशावर दररोज नवनवीन चर्चा होत आहेत. त्यावर खडसेंनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याच्याही चर्चानाही उधाण आलं होतं. यावर एकनाथ खडसेंनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे.

भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळं बाजूला फेकले गेलेले एकनाथ खडसे पक्षांतराच्या निर्णयाप्रत आले आहेत. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते भाजपला धक्का देतील, असंही बोललं जात होतं. मात्र, तसं काहीही झालं नाही. आता ते दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करतील, असं बोललं जात आहे. त्यातच आज खडसेंनी भाजप सोडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आज, ‘एकनाथ खडसेंनी स्वतः माध्यमांसमोर येत मी भाजपा पक्ष सोडलेला नाही व राजीनामाही दिला नाही,’ असं स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार की नाही याविषयी संभ्रम असतानाच महाविकास आघाडीचे नेते मात्र, खडसे पक्षांतर करणार असल्याचा दावा करत आहेत. तर, एकीकडे भाजप नेते खडसे पक्ष सोडून जाणार नसल्याचं वेळोवेळी स्पष्ट करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही एकनाथ खडसे पक्षाचे जेष्ठ नेते आहेत ते नेहमीच पक्षासोबत राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे