व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

खडसेंनी भाजपमध्ये परत यावं; बड्या नेत्याच्या विनंतीने चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा पक्षात येण्याची विनंती केली आहे. भाजपला नाथाभाऊंची गरज आहे, त्यामुळे त्यांनी भाजपत पुन्हा परतावं अशी इच्छा विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे. मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखीतमध्ये ते बोलत होते. तावडे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चाना उधाण आलं आहे.

यावेळी विनोद तावडे म्हणाले, नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. भाजपला त्यांच्यासारख्या लीडरशीपची गरज आहेच. एकनाथ खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असून त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा. त्यांच्यासारख्या वरिष्ठ लोकांनी येणं…. पण नुसतं येणं म्हणजे नाथाभाऊ ज्या स्पष्टपणे बोलतात तसं अपेक्षित नसेलच. पण जी जी माणसं पक्षात आली पाहिजेत असं आम्हाला वाटतं त्यानुसार नाथाभाऊंनी नक्की आलं पाहिजे अशी भावना विनोद तावडे यांनी व्यक्त केली .

माझे एकनाथ खडसे किंवा पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झालेले नाही किंवा त्यांना प्रस्ताव दिलेला नाही, मात्र एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा असेल, तर देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतील. पण खडसे यांना भाजपच्या शिस्तीचे पालन करावेच लागेल, असेही विनोद तावडे यांनी म्हटले आहे.