गुगलवर जाऊन टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण विचारा; खडसेंची फडणवीसांवर नाव न घेता टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील वैर सर्वांनाच माहीत आहे. आता एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत जळजळीत टीका केली आहे. एकाच व्यक्तीच्या सांगण्यावरुन मला बदनाम करण्यात आलं. माझा छळ करण्यात आला. तो कोण आहे. माहिती आहे का? गुगलवर जाऊन टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण विचारा,’ अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर निशाणा साधला.

तसंच इथल्या आमदारांना मी सांगतो तुम्ही कोणाच्या बळावर निवडून आला आहात. पण कुणाचं तरी ऐकायचं आणि नाथाभाऊच्या मागे ईडी लावायची. कधी अ‍ॅन्टी करप्शन लावायचं कधी इन्कम टॅक्स लावायचं. नाथाभाऊच्या घरावर दोन वेळा इन्कम टॅक्सची चौकशी झाली. रेड झाल्या, मात्र त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं. न्यायालयात सुद्धा तसा क्लोजर रिपोर्ट दिला आहे. मात्र तरीही आता ईडी लावण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महाजनांवर साधला निशाणा-

माझ्याकडे नाथाभाऊंचे शंभर उतारे असल्याचं काल गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. मी त्यांना आव्हान देतो की, माझ्या खानदानी प्रॉपर्टीवर मी जे कमावले असेल, जे इन्कम टॅक्सला दाखवलं असेल त्याच्यापेक्षा एक रुपयापेक्षा जास्त पॉपर्टी असेल तर मी तुम्हाला दान करून टाकतो. ज्या नाथाभाऊच्या जीवावर जिल्हा परिषद, जिल्हा बँक व दूध फेडरेशन ताब्यात आले. विकास कामे मार्गी लागली, त्या नाथाभाऊंना तिकीट दिलं नाही. मला वाटलं नव्हतं की इतके कृतघ्न होतील, नीच पातळीवर जातील,’ अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.