एकनाथ खडसेंना मोठा धक्का, पत्नी मंदाकिनी खडसे यांचा पराभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव येथील प्रतिष्ठेची मानलेल्या जळगाव दूध संघाची निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. खडसेंच्या मंदाकिनी खडसे यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. दरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या गटाचा विजय झाला आहे.

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ बरखास्त करण्यापूर्वी मंदाकिनी खडसे या संघाच्या अध्यक्ष होत्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने 20 पैकी 16 जागांवर विजय मिळवला आहे. तर खडसेंच्या महाविकास आघाडी सहकार पॅनलला केवळ 4 जागाच जिंकता आल्या.

मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, भाजप आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील हे दिग्गज नेते निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील या दिग्गजांचा दारुण पराभव झाला आहे.

मंदाकिनी खडसेंचा 76 मतांनी पराभव

जळगाव दूध संघ निवडणुकीत भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मंदाकिनी खडसे यांचा तब्बल 76 मतांनी पराभव केला आहे. दूध संघाच्या निवडणुकीत आमदार चव्हाण यांना 255 ते मिळाली आहेत, तर मंदाकिनी खडसे यांना 179 मते मिळाली आहेत. त्यामुळे खडसे यांना पराभव स्वीकारावा लागला.