हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “शिंदे-भाजप सरकार हे खोके सरकार, स्थगिती सरकार आहे, अशी टीका आमच्यावर केली जात होती. मात्र, आमचं सरकार कायदेशीर आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार, कायदेशीररीत्या बहुमताच्या आधारावर हे सरकार स्थापन झालेलं आहे. अजित दादांच्या तोंडून ही भाषा शोभनारी नाही. जर त्यांचे खोके काढले आणि एकावर एक ठेवले तर नजर देखील पोहचणार नाही. आम्हाला राज्याचा लवासा करायचा नाही,” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या टीकेचा समाचार घेतला.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विरोधकांच्या प्रत्येक टीकेला दोघांनी उत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, आमचं सरकार फेब्रुवारीत कोसळणार असं संजय राऊत हे म्हणत आहेत. मात्र, त्यांनी कुठल्या वर्षातील फेब्रुवारी मःअणा सांगितला आहे हे मात्र, सांगितलं नाही. त्यामुळे आमचं सरकार हे अजून खूप वर्ष चालणार आहे.
#LIVE : विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… https://t.co/BHCPhc6FRV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 18, 2022
आम्ही कोणत्याही कामाला स्थगिती दिली नाही. तर फक्त जेवढा निधी होता. त्याच्या पेक्षा जास्त रूपयांचे टेंडर काढण्यात आलं होत. त्याला फक्त स्थगिती दिली आहे. आम्ही चार महिन्यात एवढं काम केलं की, पुढील दोन वर्षांत आम्ही किती काम करू याची धास्ती काही लोकांनी घेतली आहे. त्यामुळे आमच्यावर टीका केली जात आहे. दिवाळीच्या शिध्यावरून देखील या सरकारवर टीका केली. परंतु, दिवाळीचा शिधा किती लोकांपर्यंत पोहोचला याची आमच्याकडे आकडेवारी आहे. 96 टक्के लोकांना दिवाळीचा शिधा पोहोचला आहे, अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.