हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चा सांगावी, अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून मोठे विधान केले आहे. कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जे ट्विट केले आहे त्यांना केंद्रीय गृहमंत्री शहांसमोरच प्रश्न विचारला. तेव्हा ते ट्विट माझे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना त्या ट्विटमागे कोण आहे. कोणता राजकीय पक्ष आहे याची माहिती मिळालेली आहे. मी त्याबाबत लवकरच माहिती देईन, असे सूचक विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदेनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सीमावादाच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले की, कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद हा मुद्दामहून पेटवला जात आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वानी राजकारण न करता कर्नाटकात राहणाऱ्या महाराष्ट्रातील बांधवाच्या व सीमाभागात राहणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.
बाळासाहेबांची सुद्धा इच्छा होती, सीमाभागाचा मुद्दा सुटला पाहिजे. अडीच वर्षांमध्ये सीमावासियांच्या योजना बंद केल्या आहेत. तुम्ही काय सीमावासियांबद्दल बोलत आहात, सीमाभागाच्या मुद्यावर राजकारण करू नका, असं मुख्यमंत्री शिंदेनी ठणकावून सांगितले.