नवी दिल्ली । अमेरिकन कार निर्माता टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सचा मालक एलन मस्क (Elon Musk) पुन्हा एकदा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. दोनच दिवसांपूर्वी, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Amazon.com Inc. founder Jeff Bezos ) हे एलन मस्कला मागे टाकत पहिल्या स्थानावर आले होते. मात्र, आता एलन मस्कने पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव मिळवले आहे. एलन मस्कची संपत्ती रॉकेटप्रमाणे वाढतच आहे. एलन मस्कची संपत्ती 199.9 अब्ज डॉलर्स आहे. तर आता बेझोस हे दुसर्या क्रमांकावर घसरले आहेत. बेझोसकडे 194.2 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) मध्ये टाॅप वर राहून मस्कने यावर्षी आणखी एक फंडिंग राऊंड पूर्ण केला.
एलन मस्कची रॉकेट कंपनी SpaceX ने गुंतवणूकदारांच्या ग्रुपच्या सेक्विया कॅपिटलकडून या महिन्यात आणखी 850 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक मिळवली. यानंतर, एलन मस्कची मालमत्ता 1100 कोटी डॉलर्सने वाढली आहे. निर्देशांकानुसार कंपनीची राउंड व्हॅल्यू सुमारे 74 अब्ज डॉलर्स आहे. ऑगस्टच्या तुलनेत यात 60% वाढ झाली आहे. मस्कची एकूण मालमत्ता सुमारे 11 अब्ज डॉलर्सने वाढविण्यात मदत झाली. मस्कची मालमत्ता वाढून 20,000 कोटी किंवा 14.80 लाख कोटी झाली आहे. गेल्या 24 तासांत त्यांची संपत्ती 920 कोटी डॉलर्सने वाढली आहे. यावर्षी त्याच वेळी, त्यांची संपत्ती 3020 कोटी डॉलर्सने वाढली आहे.
जेफ बेझोस यांची एकूण मालमत्ता 19400 कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे 14.35 लाख कोटी रुपये आहे आणि या प्रकरणात ते आता श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आहेत. याव्यतिरिक्त, या आठवड्यात मस्कने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना सोशल मीडिया अॅप क्लबहाउसवर चॅटिंगसाठी आमंत्रित केले. क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सांगितले की,”पुतीन सोशल मीडियाचा वापर करत नाहीत, परंतु हे आमंत्रण निश्चितच खूपच रंजक होते.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.