ईएमआय तीन महिने स्थगित आरबीआयचा बँकांना सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसमुळे सामान्यांसोबतच उद्योगांवर कोरोनाचा प्रभाव पाहता सरकार कर्जाच्या ईएमआयवर दिलासा देण्याची तयारी करत आहे,” असं रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. यासोबत आरबीआयने बँकांना तीन महिने ईएमआयची वसुली स्थगित करण्याचा सल्ला दिला आहे. हा आरबीआयचा आदेश नाही तर केवळ सल्ला आहे. याचाच अर्थ चेंडू आता बँकांच्या कोर्टात आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ईएमआयवर सूट द्यायची की नाही हे आता बँकांनाच निश्चित करायचं आहे.

दरम्यान, करोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेसाठी आरबीआयने आज वैयक्तिक व्याजदरात मोठी कपात केली आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 75 बेसिस पॉईंटची कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळे रेपो रेट आता 5.15 टक्क्यांवरुन 4.4 टक्क्यांवर आला आहे. यासोबतच रिव्हर्स रेपो रेटमध्ये 90 बेसिस पॉईंटने कपात करुन 4 टक्के केला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर प्रकारच्या कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळू शकतो असं शक्तिकांत दास म्हणाले.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment