हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य असाल तर आपल्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. कारण नुकतेच ईपीएफओकडून व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली गेली आहे. ज्यानंतर आता ईपीएफओच्या सदस्यांना चालू आर्थिक वर्षामध्ये 8.15 टक्के व्याज मिळणार आहे. EPFO कडून आतापर्यंत 8.10 टक्के व्याज दिले जात होते. अशा प्रकारे, 0.05 टक्के जास्त व्याज मिळेल.
सूत्रांच्या आधारे PTI या वृत्तसंस्थेकडून ही माहिती देण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि, सध्या EPFO ची दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकी दरम्यानच ही माहिती समोर आली आहे. मात्र जेव्हा अर्थ मंत्रालयाकडून याबाबत अधिसूचना जारी केली जाईल तेव्हाच हे व्याजदर लागू होतील. आता ईपीएफओचे विश्वस्त मंडळ या वाढीव व्याजदरांबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे शिफारस करणार आहे. त्यानंतर मंत्रालयाकडून त्यावर विचार करून निर्णय घेतला जाईल.
अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केल्यावर, EPFO च्या नवीन व्याजदरांनुसार व्याज मोजून पेन्शन खातेधारकांना जमा करणे सुरू करेल. दरवर्षी हीच प्रक्रिया अवलंबली जाते. जर हे नियम लागू केले गेले तर ते VPF खातेधारकांनाही हे व्याज दिले जाईल. याशिवाय ज्यांचे पैसे ट्रस्ट म्हणून काम करणाऱ्या संस्थांकडे आहेत त्यांनाही हे व्याजदर लागू होतील.
हे लक्षात घ्या कि, देशातील कोणत्याही खाजगी आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून EPFO अंतर्गत पैसे कापले जातात. त्याच्या पगारातून ठराविक रक्कम कापून ईपीएफओमध्ये जमा केली जाते. तसेच कर्मचारी निवृत्त झाल्यावर हे पैसे त्याला व्याजासहीत परत केले जातात.
त्याच प्रमाणे EPFO कडून प्रत्येक खातेदाराला त्यांचे पेन्शन खाते ऑनलाइन तपासण्याची सुविधा देखील दिली जाते. त्यामुळे कोणत्याही खातेदाराला कधीही त्याचे खाते ऑनलाइन तपासता येते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर