हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल बहुतेक सरकारी विभागांकडून ऑनलाइन सेवा दिल्या आहेत. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच EPFO ने देखील जवळपास सर्व सेवा ऑनलाइन देण्याची सुविधा आहे. त्यामुळेच EPFO ग्राहकांना PF खात्याशी संबंधित बहुतेक कामे ऑनलाइन पूर्ण करता येतील.
PF खात्यातील बॅलन्स जाणून घेण्यासाठीही PF खातेधारकाला कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. आता PF खातेदार घरबसल्या आपल्या PF बॅलन्सची माहिती घेऊ शकतील. आता त्यांना रजिस्टर्ड मोबाइलवरून मिस्ड कॉलद्वारे आणि SMS द्वारे, त्याबरोबरच Umang App च्या मदतीने आणि EPFO वेबसाइटवर लॉग इन करून PF खात्यातील पैशांची माहिती घेता येईल.
मिस्ड कॉलद्वारे अशा प्रकारे बॅलन्सची माहिती घ्या
मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या कि, मिस्ड कॉलद्वारे, PF बॅलन्सची माहिती घेण्यासाठी EPFO मध्ये आपला मोबाइल नंबर रजिस्टर असला पाहिजे. मिस्ड कॉलद्वारे बॅलन्सची माहिती मिळविण्यासाठी रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल. यानंतर काही वेळातच आपल्या खात्याची माहिती मोबाईलवर SMS द्वारे मिळेल.
SMS द्वारे PF बॅलन्सची माहिती जाणून घ्या
SMS द्वारे PF बॅलन्स जाणून घेण्यासाठी EPFO मध्ये रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर SMS करावा लागेल. यासाठी EPFO UAN LAN (भाषा) टाइप करावे लागेल. येथे LAN म्हणजे आपली भाषा असेल. तसेच इंग्रजीत माहिती मिळवण्यासाठी LAN ऐवजी ENG असे लिहा. हिंदीत माहिती मिळवण्यासाठी LAN ऐवजी HIN लिहा. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहा आणि 7738299899 या क्रमांकावर पाठवा.
Umang App द्वारे बॅलन्स कसा तपासावा हे जाणून घ्या
यासाठी आपल्या स्मार्टफोनवर Umang App डाउनलोड करा. यानंतर Umang App मध्ये EPFO वर क्लिक करा. यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा. त्यानंतर View Passbook वर क्लिक करा आणि तुमचा UAN आणि पासवर्ड टाका. आता आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर OTP येईल. OTP दिलेल्या ठिकाणी एंटर केल्यानंतर PF बॅलन्स दिसून येईल.
ऑनलाइन PF बॅलन्स तपासण्यासाठी, EPF पासबुक पोर्टलला भेट द्या. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून या पोर्टलवर लॉग इन करा. यामध्ये, पासबुक डाउनलोड / पहा वर क्लिक करा आणि नंतर पासबुक तुमच्या समोर उघडेल ज्यामध्ये बॅलन्स दिसून येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://epfindia.gov.in/
हे पण वाचा :
Investment : अशा प्रकारे गुंतवणूक करून 15 वर्षांत मिळवा 1.2 कोटी रुपये !!!
Sologamy : मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र
Bollywood : 2022 मध्ये अवघ्या 5 महिन्यात संगीत क्षेत्राने गमावले ‘हे’ 7 दिग्गज
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ, नवीन दर तपासा