हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO : जर आपण नोकरदार असाल आणि आपल्याकडे पीएफ खाते असेल तर आपल्याला एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) योजनेबाबतची माहिती असणे आवश्यक आहे. EPFO द्वारे चालवली जाणारी ही एक इन्शुरन्स स्कीम आहे, जी प्रत्येक पीएफ खातेदारासाठी उपलब्ध असेल. या योजनेअंतर्गत जर एखाद्या ईपीएफओ सदस्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 7 लाखांपर्यंतची मदत मिळेल.
1976 मध्ये EPFO कडून ही योजना सुरू करण्यात आली होती. आपल्या नोकरी दरम्यान एखाद्या EPFO सदस्याचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. कर्मचार्यांना हे इन्शुरन्स कव्हर पूर्णपणे मोफत दिले जाते. त्यासाठी त्याला कोणतेही वेगळे योगदान द्यावे लागत नाही. तसेच या योजनेसाठीचे जे योगदान आहे ते कंपनीकडूनच दिले जाईल.
EDLI योजनेचे फायदे जाणून घ्या
जर नोकरीदरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचा इन्शुरन्स बेनिफिट मिळेल.
जर मृत सदस्य मृत्यूपूर्वी 12 महिने सतत काम करत असेल तर नॉमिनीला कमीत कमी 2.5 लाख रुपयांचा इन्शुरन्स बेनिफिट मिळेल.
तसेच ही सुविधा फक्त 15 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार नसलेल्या ज्या कर्मचाऱ्यांसाठीच लागू आहे.
यामध्ये कर्मचाऱ्याला कोणतेही योगदान द्यावे लागणार नाही.
अशा प्रकारे करता येईल क्लेम
या योजनेअंतर्गत जर एखाद्या कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाला तर त्याचा नॉमिनीला इन्शुरन्स कव्हरसाठी क्लेम करता येईल. यासाठी नॉमिनी व्यक्तीचे वय किमान 18 वर्षे असावे. जर त्याचे वय यापेक्षा कमी असेल त्याच्या पालकांना त्याच्या वतीने क्लेम करता येईल. तसेच क्लेम करताना संबंधित सदस्याचे मृत्यू प्रमाणपत्र, उत्तराधिकार प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे द्यावी लागतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/site_docs/PDFs/Downloads_PDFs/EDLI_1976.pdf
हे पण वाचा :
Bank FD : खुशखबर !!! ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक एफडीवर देत आहे 9.50% व्याजदर
Tax Saving Tips : ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक करून वाचवा येईल टॅक्स, कसे ते जाणून घ्या
DigiLocker अॅपद्वारे अशाप्रकारे आपल्या स्मार्टफोनमध्ये ठेवा Driving Licence
EDLI Scheme म्हणजे काय ??? जाणून घ्या त्याच्याशी संबंधित ‘या’ खास गोष्टी
New Business Idea : घरबसल्या कमी खर्चात ‘हे’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न