हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्तंबूलमध्ये कोरोना विषाणूबद्दल घरी पार्टी केल्याच्या आरोपाखाली टर्की पोलिसांनी आयोजक आणि डीजे यांच्यासह ११ जणांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक अधिकारी म्हणाले की, काही पाहुणे डॉक्टरांसारखे कपडे घालून पार्टीत आले. शनिवारी रात्री पार्टी बायकोसेकेम्स जिल्ह्यातील व्हिला येथे आयोजित करण्यात आली होती आणि ती सोशल मीडियावर थेट शेअर केली गेली. तथापि,शोषलं डिस्टेंसिंगसाठी करण्यात येत असलेल्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याबाद्दल त्यांच्यावर टीका केली गेली. एका व्यक्तीने ट्विटरवर लिहिले की, “या मूर्खांनी इस्तंबूलमध्ये कोठेतरी घरी पार्टी केली.”
त्यांनी लिहिले, “असे मूर्ख लोक असतील तर आपण कोरोनाचा प्रसार कसा रोखू?” कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार तुर्कीमध्ये बार आणि नाईट क्लब बंद आहेत. पोलिसांनी सोशल मीडियावर हि पार्टी पाहिली आणि नंतर पार्टीचे संयोजक आणि डीजे यांच्यासह ११ जणांना ताब्यात घेतले. रविवारी इस्तंबूलच्या राज्यपाल कार्यालयाने सांगितले की त्यांच्यावर “संसर्गजन्य रोगासंबंधीच्या नियमांचे पालन न केल्याचा” आरोप आहे.
त्यात म्हटले आहे की अधिकाऱ्यांनी या पार्टीत जास्तीत जास्त लोकांना ओळखण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक आपातकालीन डॉक्टरांसारखे हातमोजे आणि मास्क घातलेलले दिसतात. तुर्कीमध्ये कोरोना विषाणूची ९२१७ प्रकरणे अधिकृतपणे नोंदली गेली आहेत आणि आतापर्यंत येथे १३१ लोकांचा बळी गेला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’