कोरोनातुन पूर्णपणे सावरलेले प्रिन्स चार्ल्स आले सेल्फ आयसोलेशन मधून बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाची पुष्टी झाल्याच्या सात दिवसानंतर ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स सोमवारी सेल्फ आयसोलेशन मधून बाहेर आले. राजघराण्याच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. ब्रिटीश सिंहासनाचे वारस असलेल्या प्रिन्स चार्ल्स (७१) यांची गेल्या आठवड्यात नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) येथे कोरोना व्हायरसची चाचणी घेतल्यानंतर स्कॉटलंडमधील रॉयल बालमोर इस्टेटमध्ये आयसोलेशनमध्ये राहत होते.

त्यांचा प्रवक्ता म्हणाला, “क्लीयरन्स हाऊस (शाही निवासस्थान) यांनी आज (सोमवारी) पुष्टी केली की प्रिन्स ऑफ वेल्स आता डॉक्टरांच्या सल्लामसलतानंतर सेल्फ आयसोलेशन मधून बाहेर आले आहे.” त्याच वेळी,प्रिन्स चार्ल्सची पत्नी कॅमिला (७२) यांना मात्र तपासणीत कोरोना विषाणूची लागण झालेली आढळली नाही परंतु तेव्हापासून त्यादेखील बालमोरलमध्येही आयसोलेशन राहत होत्या. या रॉयल दाम्पत्याची गेल्या सोमवारी वैद्यकीय तपासणी झाली.

त्यापूर्वी ते दोघे जेटद्वारे स्कॉटलंडला आले होते आणि तेव्हापासून ते तिथेच होते. त्यानंतर क्लीयरन्स हाऊस म्हणाले, “प्रिन्सचे हे संक्रमण कसे झाले हे शोधणे शक्य नाही कारण मागील आठवड्यांत ते बर्‍याच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न

जगभरात कोरोनाच्या घटनांची संख्या सात लाखांच्या पुढे,मृतांचा आकडा ३३ हजारांपेक्षा जास्त

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर का महत्वाचे? घ्या जाणुन

तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका

कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी 

Leave a Comment