आभाळ जरी कोसळलं तरी….अभिनेता सुबोध भावे यांना आली टिळकांची आठवण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई |आत्ताची आजूबाजूची परिस्थिती बघितली की लोकमान्य यांचं एकचं वाक्य आठवतं “कितीही संकटं आली,आभाळ जरी कोसळलं, तरी त्यावर पाय ठेऊन उभा राहीन मी! या परिस्थितीतून बाहेर येण्याची ताकद सर्वाना मिळो हीच प्रार्थना’ अशी पोस्ट अभिनेता सुबोध भावे यांनी शेअर केली आहे.

लॉकडाउन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या नागरिकांसाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपला हात पुढे केला आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुबोध सारख्या अनेक सेलिब्रिटी या गोरगरिबांना धीर देत आहेत.

अभिनेता सुबोध भावे समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्याचं मत मांडत असतो. सध्या देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाउन जाहीर केला आहे. अनेकांना आपल्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येत आहेत. मात्र ही वेळदेखील निघून जाईल, असं म्हणत त्याने लोकमान्य टिळकांचं एक वाक्य शेअर करत नागरिकांना धीर दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.