हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला जाणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. सध्या जगभरात मंदीसदृश वातावरण आहे, अशा परिस्थितीत निर्मला सीतारामन या अर्थमंत्री म्हणून आपला सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी मध्यमवर्गीयांना आयकरात सवलत हवी आहे तर शेतकर्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेतवाढ होणे अपेक्षित आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ते 6 हजार रुपयांवरून 8 हजार रुपये केले जाऊ शकते , असे मानले जात आहे.
बियाणे, खते आणि कीटकनाशकांसाठी जास्त पैसे मिळण्याची अपेक्षा
सध्या शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधी अंतर्गत सरकारकडून वार्षिक 6000 रुपये दिले जातात. तसेच हे पैसे 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आता जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. जेणेकरून त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना प्रगत जातीचे बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करता येतील. हे जाणून घ्या कि, आता लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 13 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत. Budget 2023
सरकारी अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा
शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेला किंवा अनुदानासाठी अर्ज करायचा असेल तर Hello Krushi हे मोबाईल अँप सर्वोत्तम पर्याय आहे. गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi अँप आजच तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या. यामध्ये सरकारी योजना या विंडो मध्ये तुम्हाला सर्व सरकारी योजनांची माहिती देण्यात येते. तसेच तुम्ही घरी बसून हव्या त्या सरकारी योजनेसाठी पैसे खर्च न करता अर्ज करू शकता. तेव्हा आजच Hello Krushi अँप डाउनलोड करून या सेवेचे लाभार्थी बना.
Click Here to Download Hello Krushi App
कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहे ते जाणून घ्या
शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून यावरही अनुदान देण्यात यावे. तसेच, शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन पिके आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे.
कृषी टेक्नोलॉजी स्टार्टअप्सना टॅक्स मध्ये सवलत देण्यात यावी जेणेकरून शेतकरी भारतीय कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलीजन्स आणि ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा झपाट्याने अवलंब करून उत्पादन वाढवू शकतील.
शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी सरकारने एक लाख कोटी रुपयांच्या कृषी उत्पादन निधीतून काही निधी बाजूला ठेवावा. यासोबतच शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदानही देण्यात यावे.
तेलबियांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी पुरेसे आर्थिक सहाय्य मिळावे. तसेच खाद्यतेलासाठी राष्ट्रीय अभियान सुरू करण्याची गरज आहे. Budget 2023
अशा प्रकारे तपासा आपल्या हप्त्याचे स्टेट्स
सर्वात आधी PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
येथे उजव्या बाजूला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
त्यावर क्लिक केल्यानंतर Beneficiary Status हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. ते निवडल्यानंतर, Get Data वर क्लिक करा.
येथे क्लिक करून आपल्या खात्यामध्ये पैसे आले आहेत की नाही हे कळेल.
जर FTO is generated and Payment confirmation is pending असेल तर त्याचा अर्थ असा की आपले पैसे प्रोसेसमध्ये आहेत. Budget 2023
हे पण वाचा :
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या
Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या
PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???