हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नाची अंगठी हि एखाद्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्वाची गोष्ट असते.जेव्हा ही रिंग हरवते तेव्हा त्या व्यक्तीला खूप वाईट वाटते. असेच काहीसं अमेरिकेतील एका पती-पत्नीच्या बाबतीत घडले आहे ज्याच्या लग्नाची रिंग ३ वर्षांपूर्वी हरवली होती.पण आता या लॉकडाऊनच्या वेळी, त्याला ही रिंग एका रेस्टॉरंटमध्ये मिळाली आहे.हे रेस्टॉरंट न्यूयॉर्कमध्ये आहे आणि रिंग सापडलेले जोडपे आहेत माइक आणि लिसा.
खरं तर, कोरोना व्हायरसमुळे न्यूयॉर्क ते फ्लोरिडा पर्यंत जवळपास सर्वच रेस्टॉरंट्स सध्या बंद आहेत.अशा परिस्थितीत फ्लोरिडामधील कोकोनट रेस्टॉरंटचे मॅनेजर रायन क्रिवॉय यांनी विचार केला की रेस्टॉरंटचे नूतनीकरण का करू नये. जेव्हा तो रेस्टॉरंटमध्ये साफसफाई करण्यात गुंतला तेव्हा त्याला एक अंगठी व सोन्याचे नाणे मिळाले.त्या रिंगवर माईक आणि लिसा लिहिलेले होते आणि त्याबरोबर कौतुकही लिहिले होते.आता ही अंगठी व सोन्याच्या नान्याचे काय करावे हे त्याला समजू शकले नाही.त्याने हे रेस्टॉरंटच्या मार्केटींग मॅनेजर साशा फॉर्मिकाला सांगितले, त्यानंतर साशाने त्या अंगठीचे छायाचित्र काढून ते फेसबुकवर टाकले आणि संपूर्ण माहिती सांगितली.
हे पाहून साशाची पोस्ट व्हायरल झाली. सुमारे ५००० लोकांनी त्यांच्या फेसबुक टाइमलाइनवर त्यांचे पोस्ट शेअर केले. याचा परिणाम असा झाला की या रिंगचे छायाचित्र माइक आणि लिसापर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला. त्याने साशाशी संपर्क साधून सांगितले की २०१७ मध्ये तो त्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला आला होता,परंतु हात धुण्यासाठी म्हणून जेव्हा तो गेला तेव्हा अंगठी त्याच्या हातातून निसटली आणि कोठे तरी पडली.त्यांनी तिला बराच वेळ शोधले होते पण तेव्हा ती सापडली नव्हती.माईकची पत्नी लिसानेही रिंग त्याच्या मालकीची असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी त्यावेळी रेस्टॉरंटमध्ये काढलेले छायाचित्र साशाला दाखवले.त्यानंतर मग ही अंगठी माईक आणि लिसाकडे परत आली.
रेस्टॉरंटचे मॅनेजर रायन यांनी सांगितले की ही अंगठी त्याच्या मालकाकडे परत आली,परंतु सुमारे एक लाख ५४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे नाणे टीप बॉक्समध्ये ठेवण्यात आले, जेणेकरुन रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी आपापसात वाटून घेऊ.शकतील .
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.