हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या दरम्यान, फेसबुकने आपल्या सर्व कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होम देण्याची ऑफर दिली आहे. कंपनी ही ऑफर बर्याच काळासाठी सुरू ठेवू शकते. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे की,’ कंपनी आपल्या कर्मचार्यांना कायमचेच वर्क फ्रॉम होम करण्याची ऑफर देऊ शकते. झुकेरबर्ग म्हणाले की,’ फेसबुकला ‘वर्क फ्रॉम होम’ या धोरणाला प्रोत्साहन द्यायचे. ते म्हणाले पुढे म्हणाले की,’ फेसबुकला वर्क फ्रॉम होम यापुढेही चालू ठेवायचे आहे.’
मार्क झुकेरबर्ग म्हणाले की,” येत्या १० वर्षांत कंपनीचे सुमारे ५० टक्के कर्मचारी रिमोटली वर्किंग करतील. त्यांना कार्यालयात येण्याची गरज नाही. या निर्णयामुळे कर्मचार्यांचा कोणत्याही संसर्गापासून बचाव होईल. ते म्हणाले की,” ‘वर्क फ्रॉम होम’ केल्यामुळे कर्मचार्यांच्या पगारावर परिणाम होईल, मात्र ते मार्केट रेटच्या नुसार असतील आणि लोकेशन नुसार त्याच्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल.
ते म्हणाले पुढे की,” या ‘वर्क फ्रॉम होम’ पॉलिसीमुळे केवळ कर्मचार्यांनाच सोयीचे होणार नाही तर त्यामुळे कंपनीचा खर्चही कमी होईल, कारण ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कंपनीच्या खाणे, वीज आणि इंटरनेटयावरील खर्च कमी होईल. या निर्णयाचा कंपनीच्या वित्त आणि कर्मचार्यांच्या पॅकेजवर काय परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते म्हणाले की,” यामुळे फेसबुकच्या ६० टक्के कर्मचार्यांना फ्लेक्झिबल वर्क एनवायरनमेंट आवडेल. ‘वर्क फ्रॉम होम’ मिळाल्यामुळे कम्पनीच्या सुमारे ५० टक्के कर्मचार्यांना इतर शहरांमध्ये जाणे सोयीचे होईल, कारण त्यांना स्वस्त शहराकडे जायचे आहे.
तसेच दुसरीकडे फेसबुकने असेही म्हटले आहे की,” लॉकडाऊननंतर ते केवळ २५ टक्के कर्मचाऱ्यांना घेऊन कार्यालयात काम करतील. इतरांकडे ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा पर्याय असेल. ज्या कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करायचे आहे त्यांना १ जानेवारी २०२१ पर्यंत त्यांची संपूर्ण माहिती आणि त्यांचे लोकेशन द्यावे लागेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.