मुंबई | काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या कामकाजामुळे चर्चेत आहेत. तसेच त्यांचे नाव अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत जाहीर झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय , तसेच त्यांच्या कामाची पद्धत हि जनतेला आवडली आहे.त्यामुळे प्रत्येक निर्णयात जनतेची साथ मुख्यमंत्र्यांना लाभली आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत टोला लगावला आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले कि, “गेल्या नऊ महिन्यांमध्ये उद्धव ठाकरेआणि त्यांच्या सरकारने केलेलं काम जनतेला आवडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबद्दल जनतेच्या अजूनही चांगल्या भावना आहेत. त्यामुळे हे सरकार पडणार नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहावीत,”
महाआघाडी सरकार यांच्यामधील सातत्याने येणाऱ्या कुरबुरी ऐकून भाजपचे नेते नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांनी महाआघाडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही असं भाकीत केलं होत. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देत त्यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि,“नारायण राणे यापूर्वी आपण कुठे होतो आणि आता कुठे आहेत. यावर त्यांनी विचार करावा ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी काय होतं हे राज्यातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. प्रवीण दरेकर यांचीही त्यांच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. त्यांचीही अवस्था हीच आहे. तेदेखील आधी कुठे होते आणि आता कुठे आहेत. त्यांच्या वक्तव्यांना फारसं महत्त्व देण्याची गरज नाही. भाजपाचे किती आमदार त्यांच्या सोबत राहतील हे दिसून येईलच. सत्ताबदलापेक्षा त्यांनी आपले आमदार सांभाळावेत,सत्ता पाडण्याचा जरी त्यांनी प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाहीत. ”असा टोला त्यांनी लगावला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.