डेअरी व्यवसायाकरिता देशभर फिरण्यासाठी विकत घेतले चक्क हेलिकॉप्टर !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भिवंडी | महाराष्ट्रामधील भिवंडी येथील एका उद्योजक शेतकऱ्याने आपल्या डेअरी व्यवसाय वाढीसाठी, देशभर करण्याकरिता हेलिकॉप्टर विकत घेतले आहे. जनार्दन भोईर असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी नुकताच डेअरी व्यवसाय सुरू केला आहे. भोईर यांचा शेतीसह बांधकामाचा व्यवसाय सुद्धा आहे.

डेरी व्यवसायाच्या वाढीसाठी देश यात्रा करावी लागत असल्यामुळे यात्रा सुखकर व्हावी यासाठी 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर विकत घेतले. त्यांनी त्यांचा व्यवसाय पंजाब, हरियाणा, राजस्थानसह गुजरात या राज्यांमध्ये वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या राज्यातील काही शहरांमध्ये विमानतळाची सोय नसल्यामुळे त्यांना रस्ते मार्गाने प्रवास करावा लागत होता. यामुळे त्यांचा खूप वेळ प्रवासामध्ये जात असे. यामुळे त्यांनी स्वतःचे हेलिकॉप्टर विकत घेतले.

जनार्दन यांच्या हेलिकॉप्टरची डिलिव्हरी 15 मार्च रोजी होणार आहे. त्यांची कथित संपत्ती 100 कोटी रुपये इतकी आहे. शेती व्यवसाय यासोबतच त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसायही आहे. त्यांनी अडीच एकरच्या जागेमध्ये हेलिपॅड बनवून हेलिकॅप्टरसाठी एक गॅरेज, एक पायलट रूम आणि एक टेक्निशियन रूम बनवली आहे. भिवंडीमध्ये मोठ्या कंपनीचे खूप गोदाम आहेत. या गोदाम मालकांना यामधून मोठ्या प्रमाणात भाडे मिळते. जनार्दन यांच्या मालकीचे अनेक गोदामं या ठिकाणी आहेत. त्यातूनही त्यांना मोठ्या प्रमाणात भाडे उपलब्ध होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.