‘शेतकऱ्यांना सन्मानानं दिल्लीत येऊ द्या! नाहीतर….’; बच्चू कडूंचा केंद्राला कडक इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. आता या लढ्याची झळ दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलनाच्या तयारीत असून, जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. रविवारीसुद्धा (29 नोव्हेंबरला) शेतकरी आंदोलनावर ठाम होते. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू(bachhu kadu) यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय चलो दिल्लीचा नारा देत शेतकऱ्यांचा प्रश्नावर ३ दिवसात तोडगा काढण्याचे अल्टिमेटम दिले आहे. तोडगा न काढल्यास महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसह दिल्लीत धडकणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हा इशारा दिला आहे.

आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये बच्चू कडू म्हणाले, ”केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार”.

https://www.facebook.com/BacchuKaduOfficial/posts/2929971903902750

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’